करूया गरिब, अनाथ मुलांसाठी एक छोटासा प्रयत्न.. 2017
मित्रांनो मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला प्रसंग सांगू इच्छितो, दिनांक १२ ऑगस्ट २०१७ या दिवशी मला माझ्या मित्राने फोन केला आणि मला सांगितले कि एक काम आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जायचे आहे. मी त्याला विचारले कि कुठे जायचे आहे मला सांग, कारण मला पण एक काम आहे त्यावेळेस तो बोलला कि किती जरी तुझे अर्जेंट काम असेल तरी तुला माझ्या सोबत यावेच लागेल. म मी थोडा विचारात पडलो नेमके काय काम असेल?
काही वेळेनंतर तो माझ्या घरी आला आणि मला त्याचा गाडीवर बसवून एका किराणा होलसेलर दुकानात घेऊन गेला. तरी मला त्याने काहीच सांगितले नाही. त्याने त्या दुकानातून ६० वेफर्स चे पॉकेट आणि ६० भिस्कीट चे पुडे घेतले आणि मला पुन्हा ते सामान घेऊन गाडीवर बसवून जवळचा जय भवानी रोड, नाशिक रोड , नाशिक च्या अनाथ आश्रम मध्ये घेऊन गेला कि जे माझ्या घरापासून काही अंतरावरच होते आणि ते मला आजपर्यंत माहिती पण नव्हते. मला आता समजून गेले कि ते सामान त्याने कश्यासाठी घेतले.
आम्ही अनाथ आश्रम मध्ये जाताच समोर अनाथ मुले आमच्या जवळ बघायला लागली. माझ्या हा पहिलाच वेळ होता कि कुठल्या अनाथ आश्रम मध्ये जाण्याचा. मला थोडे वेगळेच वाटू लागले. माझ्या मित्राने मला सांगितले कि तू अनाथ आश्रमाचा बाहेर थांब मी आलो. थोड्या वेळानंतर तो आला आणि मला सांगितले कि आपण आता हे सगळे वेफर्स आणि भिस्कीट आत जाऊन सगळ्या मुलांना वाटू शकतो. मी आश्रमाच्या साहेबांची परवानगी घेतली आहे आणि दान रजिस्ट्रेशन करून आलो आहे, हे आता सगळे तू तुझ्या हाताने सगळ्या मुलांना वाटून दे.
माझ्यासाठी हा थोडा वेगळाच आणि पहिलाच अनुभव होता. सगळे मुले लाईनमध्ये बसलेली होती. सगळ्यांना मी ते वाटण्यास सुरवात केली. प्रत्येक जण पुढे हात करून वेफर्स चे पॉकेट आणि भिस्कीट घेऊ लागले आणि घेतल्या नंतर प्रेत्यक जण थँक यू म्हणू लागले. खाऊ वाटत असताना अचानक माझ्या मनात हळहळ होयला लागली कि यार कोण असेल यांचे आई,बाप,बहीण,भाऊ कोण/कसे/कुठे असतील काय होईल यांचे, कसे घडेल यांचे भविष्य असे अनेक विचार माझ्या मनात येऊ लागले आणि सगळे वाटून झाल्यानंतर मी आणि माझा मित्र त्यांच्याशी गप्पा मारायला लागलो. थोडी त्याचा सोबत हसी मजाकही केली.
खूप चांगले वाटत होते त्यावेळेस, ज्यावेळेस त्यांच्या चेहेऱ्यावर हसू दिसत होते बिचारे. नंतर त्यांनी त्यांच्या आश्रमाचा नियमाप्रमाणे सगळ्या मुलानें आमचे सामुदायिक आभार मानले आणि आम्हीही त्यांचे आभार मानून तेथून परतलो.
म माझ्या मित्राने मला विचारले कि समजलेच असेल आता कुठे जायचे होते? आणि सांगितले कि आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे, त्या निमित्ताने आज मी हे अन्न दान केले आहे. आणि मी हे नेहमीच करत असतो, आणि माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस मी इथेच या मुलांसोबत करणार आहे आणि सगळ्या माझ्या घरच्यांना, मित्र परिवारांना इथे बोलावून घेणार आहे.
मला त्याचे विचार खूप आवडले मी त्याचे मनापासून आभार मानले कारण आज माझ्याकडून खूप चांगले काम घडले होते, आणि मि माझ्या मनाच्या मनात विचार करू लागलो कि यार आपण रिकामा एवढा बाहेर खर्च करत असतो की ज्याचा आपण विचारही करत नाही, जर थोडे फार या अनाथ मुलांसाठी काही केले तर ते वाया नाही जाणार राव त्यांचा खराखुरा आणि निस्वार्थी आशीर्वादच मिळेल. आणि मी पण ठरवले कि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जेवढे होईल तेवढे अन्न दान या मुलांना करेल. आणि अजून जेवढे मित्र आणि परिवार असेल त्यांना हा माझ्या अनुभव सांगेल, जेणेकरून बिचाऱ्या गरीब अनाथ मुलांना मदत मिळेल.
आशा करतो कि तुम्हाला माझा हा प्रसंग/अनुभव आवडला असेल आणि तुम्हीपण काहीतरी तुमच्या शहरात, गावात, गल्लीत अनाथ मुलांसाठी थोडा आणि छोटासा प्रयत्न केला तर त्यांनाही वाटेल कि कोणीतरी आहे आमचे पण या दुनियेत.
आवडल्यास नक्की आपल्याना शेअर करा.
धन्यवाद..

Comments
Post a Comment