Posts

Showing posts from 2017

करूया गरिब, अनाथ मुलांसाठी एक छोटासा प्रयत्न.. 2017

Image
मित्रांनो मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला प्रसंग सांगू इच्छितो, दिनांक १२ ऑगस्ट २०१७ या दिवशी मला माझ्या मित्राने फोन केला आणि मला सांगितले कि एक काम आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जायचे आहे. मी त्याला विचारले कि कुठे जायचे आहे मला सांग, कारण मला पण एक काम आहे त्यावेळेस तो बोलला कि किती जरी तुझे अर्जेंट काम असेल तरी तुला माझ्या सोबत यावेच लागेल. म मी थोडा विचारात पडलो नेमके काय काम असेल? काही वेळेनंतर तो माझ्या घरी आला आणि मला त्याचा गाडीवर बसवून एका किराणा होलसेलर दुकानात घेऊन गेला. तरी मला त्याने काहीच सांगितले नाही. त्याने त्या दुकानातून ६० वेफर्स चे पॉकेट आणि ६० भिस्कीट चे पुडे घेतले आणि मला पुन्हा ते सामान घेऊन गाडीवर बसवून जवळचा जय भवानी रोड,  नाशिक रोड  , नाशिक  च्या अनाथ आश्रम मध्ये घेऊन गेला कि जे माझ्या घरापासून काही अंतरावरच होते आणि ते मला आजपर्यंत माहिती पण नव्हते. मला आता समजून गेले कि ते सामान त्याने कश्यासाठी घेतले. आम्ही अनाथ आश्रम मध्ये जाताच समोर अनाथ मुले आमच्या जवळ बघायला लागली. माझ्या हा पहिलाच वेळ होता कि कुठल्या अनाथ आश्रम मध्ये जाण्याच...